समृद्धी कारखाना अल्पभूधारक शेतकऱ्यांना करणार 'जल समृद्ध' : विहरीसाठी देणार पन्नास टक्के अर्थसहाय्य.
समृद्धी कारखाना अल्पभूधारक शेतकऱ्यांना करणार 'जल समृद्ध' : विहरीसाठी देणार पन्नास टक्के अर्थसहाय्य घनसावंगी : घनसावंगी मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेती समृद्ध करण्यासाठी समृद्धी शुगर्सचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांनी अल्पभूधारक ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी पन्नास टक्के अर्थसहाय्य देण्यासाठी योजना सुरु केली आहे . या योजनेतून विहीर खोदणाऱ्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी यासाठी शासनाच्या योजनेतून 'सौर कृषी पंप' आणि बाराही महिने पाणी उपलब्ध राहण्यासाठी 'मागेल त्याला शेततळे' योजनेतून शेत तळ्याचा लाभ प्राधान्याने मिळवून देणार असल्याची माहिती समृद्धी शुगर्सचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी मोफत एक क्विटल साखर योजना, शेतकऱ्यांचे शेतरस्ते स्वखर्चातून खुले करण्याची मोहीम आणि आशा व अंगणवाडी सेविकांच्या मुलींच्या लग्नासाठी २१ हजाराची मदत या अभिनव योजनेमुळे समृद्धी कारखाना लोकप्रिय झाला. आता शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपल्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी ...