औरंगाबादचा चेहरा मोहरा बदलणार 'G-20' म्हणजे आहे तरी काय ?
G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20. हा जगातला प्रमुख विकसित आणि विकसनशिल देशांचा राष्ट्रसमूह आहे. 1999 साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती. पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात 1997 साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20 गट उदयास आला.अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा त्यामागचा हेतू होता..
सुरुवातीला केवळ या 20 देशांचे अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा करायचे. मात्र 2008 च्या आर्थिक संकंटानंतर या देशांचे राष्ट्रप्रमुख वर्षापासून एकदा G20 राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ लागले..
G-20 राष्ट्रगटाचे सदस्य.
अर्जेंटिना,इंडोनेशिया,सौदी अरेबिया,ऑस्ट्रेलिया,भारत दक्षिण आफ्रिका,ब्राझील,इटली,तुर्की,कॅनडा,जपान, ब्रिटन,चीन,दक्षिण कोरिया,अमेरिका,फ्रांस,मेक्सिको, युरोपियन युनियन,जर्मनी,रशिया भारतासह अशा एकून 19 देशांचा समावेश यात आहे. युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य आहे.
राष्ट्रगटाचे महत्त्व.
•जगातील 60 टक्के लोकसंख्या G20 राष्ट्रांमध्ये राहाते. •जगाच्या एकूण जीडीपीच्या 85 टक्के जीडीपी या देशांतून येतं.
•जागतिक व्यापारातील 75 टक्क्यांहून अधिक व्यापार G20 देशांत एकवटला आहे.
•G20 हे जी-7 या औद्योगिक देशांच्या राष्ट्रगटाचं विस्तारीत रूप मानलं जातं.विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हा या गटाचा उद्देश आहे.
औरंगाबाद शहरातील बदल
औरंगाबाद शहरात फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान G-20 च एक शिष्टमंडळ भेट देणार असल्याचे सांगितले जाते.त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम सध्या सुरू आहे. जागतिक वारसा स्थळ असलेले अजिंठा व वेरूळ लेणीला हे शिष्ट मंडळ भेट देणार आहे.औरंगाबाद शहरात होत असलेले प्रमुख कामे.
•खड्डेमुक्त रस्ते
•हर्सूल ते अजिंठा रस्त्याचे काम..
✍️सोमनाथ भाऊसाहेब गव्हाणे.
मो -9860062569.