प्रशासकिय व्यवस्थेत बदल घडवणारे प्रामाणिक अधिकारी श्री तुकाराम मुंढे
महाराष्ट्रातील बिहार अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील 'ताडसुन्ना' या गावात ३ जुन १९७५ या दिवशी तुकाराम मुंढे यांचा जन्म झाला.मुंढे आईच्या पोटात असताना वडील निवर्तले पुढे आईने संगोपन करत शिक्षण व चांगले संस्कार देऊन आज एका प्रामाणिक व कर्तव्यकठोर अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे साहेबाना घडवलं.आर्थिक बेताची परिस्थितीत जीवनाची वाटचाल करताना अनेक अडथळे वाटसर करताना मनात नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण करणं हे फार गरजेचं असतं अशा परिस्थितीला बुद्धिमत्तेची जोड दिल्यास चित्र पालटु शकते हा स्वतः मधील विश्वास त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देतात यात तिळमात्र शंका नाही.
एमपीएससी परीक्षेत वित्त विभागात नौकरी मिळाली परंतु ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने जळगावमध्ये व्याख्याते म्हणून २ महिने काम केले नंतर २००५ ला 'यशदा' पुणे येथे प्रशिक्षण काळात यूपीएससी परीक्षेत देशातून २० वा रँक मिळवून आयएएस म्हणून प्रशासनात सोलापूर मधील धरणी येथे प्रकल्प अधिकारी म्हणून धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केली. पुढे नांदेड येथे उपजिल्हाधिकारी तसेच २००८ साली नागपुर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती होताच एका शाळेत भेटी दरम्यान काही शिक्षक अनुउपस्थित असल्याचे लक्षात आले व मेडिकल ऑफिसर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली येथून त्यांच्या बेडर व शिस्तप्रिय अशी ओळख निर्माण झाली.गैरहजेरी शिक्षकाच प्रमाण १०-१२% वरून १-२ टक्यावर आणण्यात मुंढे साहेबाना यश मिळाले.पुढील प्रशासकीय वाटचाल २००९ ला नशिक आदिवासी आयुक्त, मुबईला kvik मध्ये CEO, जालन्याला कलेक्टर म्हणून पदभार सांभाळतना अनेक म्हतावचे निर्णय घेऊन प्रशासनात आमूलाग्र बदल करून जनतेला उत्तरदायी,लोकाभिमुख व पारदर्शक सेवा मिळावी यासाठी आदेशाची नियमावली जाहीर केली. जायकवाडी प्रकल्प काम सहा वर्षांपासून रखडले होते ते तीन महिन्यात पूर्णत्वास नेले. सोलापुर जिल्ह्यात जिल्हाधिकारी असताना वाळू माफिया यांच्यावर mpda कायदा अंतर्गत कारवाई करून कडक निर्बंध लादले. त्यामुळे शासनाचा महसूल वाढला मुंबई येथे विक्रीकर सहायुक्त असताना १४३ कोटीचा महसूल ५०० कोटींवर पोहचीवला.पंढरपूर धार्मिक स्थळांना व्हीआयपी दर्शन सुविधा बंद करून दर्षणरांगेत वेळेत भाविकांना दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली व जवळपास ३००० शौचालये उभे केले.पुढे नवी मुंबई आयुक्त walk with commisioner हा उपक्रम राबवून जनतेचा सहभाग वाढवला तसेच त्यांच्या महानगर पालिका विषयी समस्या जाणून ऑन थ स्पॉट निराकरण व्हावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्यामुळे बदली वेळी लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करु लागली.पुणे पी एम पी एल अध्यक्ष असताना ६ लाख लोक बसने अप डाऊन करत होते त्यांची संख्या ९ लाख करण्यासाठी बसचे तंत्रज्ञान व एसी सुविधा कमी वाजवी दरात उपलब्ध केल्या नागपुर आयुक्त पदी काम केले नंतर एडस प्रतिबंधक खात्यात मुंबई येथे सचिव म्हणुन कामं केले आता काही दिवस त्यांच्याकडे आरोग्य आयुक्तपदाची धुरा असताना वाखण्याजोगे कार्य करून आरोग्य व्यवस्थेतील बेपर्वाई चहावट्यावर आणुन पडलेले खिंडार भरून काढले हा प्रशासकीय कार्याचा प्रवास.
राजकीय मंडळीकडून स्टंटबाजी चे आरोप आणि त्याचे खंडन
काही अपवाद सोडले तर नागरिकांना हवाहवासा असणारा अधिकारी तुकाराम मुंढे याच्यावर मागील काही दिवसांच्या कारकीर्दीत स्टंटबाजी करतात.. एका विशिष्ठ राजकीय गटासाठी काम करतात असे आरोप झाले या आरोपाचे खंडन करताना मुंढे साहेबांनी खुलास्यात सांगितले की असे काही मी केले असते तर ओरिएंटेड रिझल्ट लोकांना मिळाला नसता किंवा लोकांनी माझ्या बदलीचे वेळीं निदर्शन केली नसती अर्थात सत्य हे व्यवस्थेला पचत नाही त्यामुळे राजकीय सुडा पोटी अधिकाऱ्याची वाताहत करणे हा राजकीय मंडळींची खरी मेख आहे.उपेक्षित वर्गाना न्याय मिळवून देणे महिला सबलीकरण करणे तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा असे व्यापक धोरण घेणे चुकीचा आहे का याची शहानिशा सुज्ञ नागरिकांनी करावी व अशा अधिकाऱ्याची पाठीशी उभे राहावे हि माफक अपेक्षा...
✍️ सोमनाथ भाऊसाहेब गव्हाणे.
मो -9860092569