महिला हिंसाचार निर्मूलनासाठी एनजिओ चा पुढाकार महत्वाचा.

महिला आणि पुरुष आजच्या युगात कुठल्याही क्षेत्रात बरोबरीने काम करत आहे.महीलांचा सन्मान करणे हि आपली संस्कृती.मागील काही घटनांमध्ये महिलांवरील हिंसाचाराचे प्रमाण वाढले हे अनेक अहवालातून समोर आले आहे.मुळात या घटना का घडतात?कशामुळे घडतात व शासनाची या संदर्भातील कायदेशीर बाजु या मुद्याचा मुळाशी जाणे हा यातील महत्वाचा भाग.



*महिलांवरील हिंसाचाराची सद्यस्थिती*

महिलांवरील हिंसाचार म्हणजे सामान्यतः कोणत्याही वयोगटातील कोणत्याही जातीच्या महीलावरील अपराध यात खून ,अत्याचार,विंनयभंग, बलात्कार आणि बालहत्या अशा विविध स्वरूपाचे गुन्हे यात समावेश आहे.२०१२ मध्ये भारतात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण ४% होतें म्हणजे सरासरी ३ मिनिटात एक महिला हिंसाचाराला बळी पडत आहे...असे अनेक हिंसक रूप धारण करणारी वृत्ती दिवसेदिवस व्यापक  व विस्तृत होत असताना सामाजिक प्रगल्भता स्पष्ट निर्देश होत आहे.विवाहानंतर हुंडा मागणी करणे व वराची मागणीची पूर्तता न झाल्यास वधूला शारीरिक आणि मानसिक छळले जाते यातून पुढे वैवाहिक जीवनात नैराश्य आणि पुढे मृत्यूचे टोकाचे पाऊल असे अनेक उदाहरणं आपण बघत आहोत..


*एन जी ओ चा सहभाग व जनजागृती*

यावर उपयोजना करणे हे शासंनासोबत आपली सामाजिक जबाबदारी आहे..याचे भान सुज्ञ मंडळींनी ठेवणं गरजेचं आहे.
आंतरराष्ट्रीय हिंसाचार निर्मुलन साठी अनेक संघटना पुढे सरसावत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.यातून हिंसाचार निर्मुलन साठी योग्य दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे अनेक एनजिओ व्यवस्थापक यांनी प्रतीपादित केले.२५ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मुलन दिन म्हणुन जागतिक अंतरराष्ट्रीय संघटना ने जाहीर केले आहे.हिंसाचाराच्या विरोधात एकजूट होऊन लढुयात ही संकल्पना घेऊन सर्वांनी या यासाठी जनजागृती हा उपक्रम करून या संवेदनशील मुद्याला गांभीर्याने घेऊन सखोल विचार करायची गरज आहे या विषयाला घेऊन अनेक संस्था सर्वेशन करत असुन सगळ्याचा निष्कर्ष एकच आहे...

✍️ सोमनाथ भाऊसाहेब गव्हाणे.
मो -9860092569

Popular posts from this blog

घनसावंगी मतदारसंघातील पांदन रस्त्याचे जनक;सतीशजी घाटगे पाटील..

प्रशासकिय व्यवस्थेत बदल घडवणारे प्रामाणिक अधिकारी श्री तुकाराम मुंढे