घनसावंगी मतदारसंघातील पांदन रस्त्याचे जनक;सतीशजी घाटगे पाटील..

अंतरवाली सराटी ते रामगव्हाण (2 किलोमीटर) तसेच अंतरवाली सराटी कॅनल पूल ते चर्मापुरी नालेवाडी शिव पांदन रस्ता (3 किलोमीटर ) हे शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत रस्ते महत्त्वाचे होते.


शेतात जाण्या येण्यासाठी, शेतमालाची ने - आन करण्यासाठी बहुतांश शेतकरी या रस्त्यावरच अवलंबून होते,तरीसुद्धा गेली कित्येक वर्षे रस्त्याचा मजबुती करण्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. काही दिवसापूर्वी नालेवाडी चे सरपंच अरुण घुगे यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 'घनसावंगीतील पांदन रस्त्याचे जनक सतीशजी घाटगे पाटील साहेब' यांच्याकडे आग्रह धरला.

शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायम तत्पर असलेले लोकप्रिय नेतृत्व तसेच घनसावंगी विधानसभा निवडणुकीचे प्रमुख तथा समृद्धी शुगर लिमिटेड चेअरमन सतीशजी घाटगे पाटील यांनी तात्काळ या रस्त्यांची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते.

दिलेल्या शब्द प्रमाणे मातीकाम व मुरूम मजबुतीकरण साहेबांच्या नेतृत्वाखाली,स्वखर्चातून या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली.तसेच बहुतांश काम हे प्रगतीपथावर आहे. लवकरच हा रस्ता खडीकरण करून मजबूत करण्यात येईल..

आज घनसावंगी मतदारसंघातील अनेक शेतकरी  सतीशजी घाटगे पाटील यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात.साहेब सुध्धा क्षणाचाही विलंब न लावता त्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ प्रयत्न करतात. आतापर्यंत जवळपास 250 किलोमीटर हून अधिक पांदण रस्त्यांचे जाळे साहेबांनी घनसावंगी मतदार संघात विणले. त्याचा घनसावंगी मतदार संघातील लाखो शेतकऱ्यांनाच फायदा होतो. शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने समृद्धी आणण्याचा सकारात्मक प्रयत्न सतीश घाटगे पाटील साहेब करताना दिसतात. त्यांच्या या सामाजिक कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

#धन्यवाद साहेब..


✍️ सोमनाथ भाऊसाहेब गव्हाणे.
निपाणी पिंपळगांव ता.घनसावंगी जि.जालना.
मो.9860092569

Popular posts from this blog

प्रशासकिय व्यवस्थेत बदल घडवणारे प्रामाणिक अधिकारी श्री तुकाराम मुंढे

महिला हिंसाचार निर्मूलनासाठी एनजिओ चा पुढाकार महत्वाचा.