यशस्वी महिला व्यावसायिक अर्चना मिश्रा..
सुंदरता हा दैवी अविष्कार असतो तो सहजासहजी सगळ्यांनाच मिळत नाही याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आर्या श्री मेक ओव्हर अँड ब्युटी पार्लर च्या मालक अर्चना मिश्रा."कोण कहता है आप सुंदर नही हो कभी खुद को देखा है, आप बहुत सुंदर हो" जेव्हा त्या हे वाक्य सहज बोलून जातात तेव्हा खरंच सुंदरतेचा त्याचा अर्थ कळायला लागतो.घर संसार नातीगोती सांभाळता सांभाळता गेल्या अठरा वर्षांपासून आर्या श्री मेक ओव्हर & ब्युटी पार्लर च्या मालक अर्चना मिश्रा महिलांचे सुंदर दिसण्याचे स्वप्न साकार करत आहे.
लग्नात भेटवस्तू म्हणून मिळालेला बेडरूममधील ड्रेसिंग टेबल व जुनी विकत घेतलेली खुर्ची व आरसा एवढेच काय ते तुटपुंजा सामग्रीवर 2004 सा ली सुरू केलेला ह्या छोटा व्यवसाय आज अर्चना मिश्रा व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या चार महिलांचं उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनल असून तटपूंज्या सामग्रीवर उभा राहिलेल्या व्यवसायाचा आज वटवृक्ष मध्ये रूपांतर झाल आहे.
अर्चना मिश्रा यांचे बालपण व शिक्षण औरंगाबाद येथून त्यांनी पूर्ण केले.अर्चना मिश्रा यांनी विज्ञान या विषयांमध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या विवाहाचा निर्णय घेतला.'प्रेग्नन्सी 'हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा कलाटणी देणारा क्षण ठरला. वनस्पती शास्त्रामध्ये पदवीत्तर पदवी संपादन करण्याची इच्छा असताना सुद्धा गरोदरपणामुळे अपूर्ण राहिली परंतु त्यांनी गरोदरपणात हार न मानता याच गरोदरपणाचा बलस्थान म्हणून आपल्या आयुष्यात उपयोग करून घेतला,घराशेजारी एका सलून व्यवसायिक महिलेचं त्यांना विशेष आकर्षण होत, एकंदरीत गरज, आकर्षण व आवड याचा मिलाफ करत, त्यांचं बाळ सव्वा महिन्याचा असताना याच काळात त्यांनी ब्युटी पार्लर सुरू करण्याचा निर्णय घेतला..
अर्चना मिश्रा यांनी आयुष्यात आलेल्या प्रत्येक आव्हानात्मक काळाला सकारात्मक दृष्टीने बघितलं, लॉकडाऊन कोरोणा प्रतिबंधात्मक निर्बंधामुळे अनेक सलून व्यवसाय बंद होत असताना त्यांनी या वेळेचा आपल्या व्यवसायासाठी सदउपयोग केला.लॉकडाऊन बद्दल आलेल्या अडचणी बद्दल त्यांना विचारले असता त्या सांगतात,"लॉकडाऊनमुळे परत एकदा माझा आयुष्य बदललं.सगळीकडे निराशावादी वातावरण होतं व्यवसाय बंद करावा लागतो की काय ही भीती मनात होती परंतु मी या काळात आपल्या व्यवसायाबद्दल काहीतरी नवीन शिकण्याचं ठरवलं.स्वतःमधील उणिवा भरून काढण्यासाठी व्यवसाय संदर्भातील अनेक नवीन कोर्स ऑनलाईन शिकवणी वर्गाच्या माध्यमातून केले...
अर्चना मिश्रा एक यशस्वी महिला व्यवसायिक तर आहेतच त्यासोबतच त्यांचं पर्यावरण व प्राण्यांवर असलेले विशेष प्रेम सुद्धा त्यांच्या कृतीतून अधोरेखित होतं.वाढदिवसानिमित्त भेटवस्तू म्हणून देताना काहीतरी पर्यावरणाला उपयुक्त भेटवस्तू देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या या संकल्पनेबद्दल त्यांना विचारले असता त्या सांगतात,"आपण सर्वांनीच पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, भेटवस्तू म्हणून पुष्पगुच्छ देण्यापेक्षा मला रोपट द्यायला आवडत व भेटवस्तू म्हणून मी ते आतापर्यंत देत आहे...
कामाच्या व्यापातून वेळ काढून त्या आवर्जून लिखाण सुद्धा करत असतात चालता बोलता लिखाण करत त्यांनी अनेक कविता लिहिल्या सुद्धा त्यातील एक,"मै पितल नही ना चांदी हु,ना हू सोने का टुकडा मुझे ठोक ठोक के मत छेडो मुझे मेरे आकार मे रहने दो मुझे मेरे जैसा रहने दो"
यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे असे विचारले असता त्या सांगतात,"सर्वप्रथम तर मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे आपण तंदुरुस्त ठेवणे गरजेचे आहे दुसऱअस की एकतर नकारात्मक लोकांपासून दूर राहायला पाहिजे, अथवा नकारात्मक लोकांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून त्यातून प्रेरणा घ्यायची.माझा स्टॉफ माझं घर, कामगारांना कम्फर्ट झोन देणं गरजेचं असतं असंही ते सांगतात".कित्येक महिलांचा सुंदर दिसण्याचा स्वप्न साकार करत असताना स्वतःच्या लग्नाचा मेकअप मात्र त्यांना मेकअप आर्टिस्ट गैरहजर असल्यामुळे स्वतः करावा लागला याची त्यांना कायम खंत वाटते.
संदेश-सर्वांनी शिक्षण पूर्ण करायला हव.माझ्यामते दोनच जाती आहेत शिक्षित आणि अशिक्षित.शिक्षित व्यक्तींचा बघण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा असतो त्यामुळे शिक्षण हे अनिवार्य आहे आणि ते सर्वांनी पूर्ण केल पाहिजेत.. सर्वांनी तणाव विरहित राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे तणावाचा परिणाम आपल्या चेऱ्यावर होत असतो त्यामुळे आनंदी रहा,हिम्मत ठेवा.
✍️ सोमनाथ भाऊसाहेब गव्हाणे
मो -9860092569.