खडतर प्रवास अत्यंत धीरोदात्तपणे सोसून यशस्वी होणाऱ्या अधिकारी डॉ.सुरेखा माने
डॉ. सुरेखा माने मॅडम सध्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी म्हणून औरंगाबाद येथे पशुसंवर्धन विभागात कार्यरत आहेत.... त्यांनी यापूर्वी पुणेस्थीत 'प्रोझोन सीमन लॅब' व बीड येथे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे.
डॉ.सुरेखा माने मॅडम यांचा जन्म बीड जिल्ह्यातील,जेमतेम पंधराशे लोकसंख्या असलेल्या ' वनकरंजे ' ह्या छोट्याश्या गावातला... सुरेखा माने यांचे शिक्षण इयत्ता तिसरी पर्यंत गावातच त्यांनी पूर्ण केल.वडील अल्पभूधारक शेतकरी व गावचे पोलीस पाटील.आपल्या मुलीने डॉक्टर व्हावं हे त्यांचे स्वप्न.त्यांच्या वडिलांवर त्या काळी इंदिरा गांधींचा प्रभाव होता,आपल्या मुलीनेही शिकावं मोठं व स्वावलंबी व्हावं ही त्यांची इच्छा.इयत्ता तिसरी पर्यंत गावांमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना मोठ्या भावाजवळ बीड येथे शिक्षणासाठी पाठवल...
सुरेखा माने मॅडम यांच्या वडिलांची इच्छा जरी डॉक्टर होण्याची असली तरीही त्यांना स्वतः प्रशासकीय सेवेची आवड होती.मावसभाऊ व्हेटर्नरी डॉक्टर असल्यामुळे वडिलांनी त्यांना या क्षेत्रात पाठवण्याचा निर्णय घेतला.परंतु तो प्रवास साधा सोपा नव्हता कारण पशुवैद्यकीय महाविद्यालयाची अपुरी संख्या,त्यात जवळच महाविद्यालय म्हटल तर परभणी येथे.त्यांनी या क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण परभणी मधून पूर्ण केले.वडील शेतकरी असतानासुद्धा त्यांनी आपल्या मुलीला परभणी येथे वस्तीग्रहामध्ये राहुन शिक्षण पूर्ण करण्यासाठी परवानगी दिली त्या काळात समाज प्रगल्भ नव्हता बारावीपर्यंत शिक्षण झाले की लगेच लग्नाचा निर्णय पालकांकडून घेतला जायचा परंतु माने यांनी वसतिगृहात राहून पालकांचा विश्वास संपादन केला. प्रत्येक महिन्याची पैसे घरून घेताना वडिलांची होणारी तारांबळ त्यांनी बघितली आणि त्यालाच प्रेरणास्रोत बनवले..
पदवी शिक्षण घेतल्यानंतर सुरेखा माने यांनी तीन महिन्यांच्या कालावधीत गावामध्ये प्रॅक्टिस सुद्धा केली. त्यामधून जे पैसे त्यांना मिळाले ते त्यांनी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी वापरात आणले..
आपल्यामध्ये काहीतरी अतिरिक्त कला असावी ही दूरदृष्टी समोर ठेवून त्यांनी पदवीत्तोर पदवी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा फायदा सुद्धा त्यांना झाला.सध्या पदावर असण्याची पात्रता पाच वर्षे अनुभव व पदवीत्तर पदवी ही होती.पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा विवाह झाला. त्या सांगतात,"अतिशय साध्या पद्धतीने आमचा विवाह झाला. माझे पती याच क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना या कामाची जाणीव होती. तसेच वेळोवेळी त्यांचा पाठिंबा,साथ सुद्धा मला लाभली"..या काळातच जिल्हा परिषद चे वर्ग 3 ची जाहिरात निघाली.घरदार नातीगोती सांभाळता सांभाळता पशुसंवर्धन पर्यवेक्षक म्हणून त्यांनी साताऱ्यात साडेसहा वर्ष नोकरी सुध्दा केली आणि अभ्यास सुद्धा सुरू ठेवला... 2011 साली जाहिरात निघायला सुरुवात झाली त्यावेळेस पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या पदासाठी जाहिराती निघाल्या आणि त्यांनी दोन्ही परीक्षा एकदाच उत्तीर्ण केल्या.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय संदेश द्याल ? हे विचारल्यानंतर त्या सांगतात," स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी रिकाम्या हाताने परीक्षा द्यायला नको छोटी पोस्ट किंवा एखादी नोकरी करून त्यांनी परीक्षेची तयारी करावी जेणेकरून काहीतरी त्यांच्या हातात असेल आणि त्यामुळे नैराश्य सुद्धा टाळता येईल"..महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पशुपालन कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते हे विचारल्यानंतर त्या सांगतात, "आमच्या विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात त्यामध्ये तीस टक्के महिलांसाठी राखीव सवलत असते तसेच सर्वसाधारण गटात सुद्धा महिलांना प्राधान्य दिले जाते.जे काही प्रशिक्षण शिबिर आमच्या विभागामार्फत राबविण्यात येतात त्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न हा बचत गटातील महिला असावेत हा असतो.एखाद्या महिलेने दोन गाई जरी व्यावसायिक दृष्टिकोनातून सांभाळण्याचे ठरवले तर एका गाय विक्री करून जो काही पैसा मिळेल तो त्यांच्या संगोपनासाठी तर एका गाईची विक्री केल्यानंतर त्याचा निव्वळ नफा त्या महिलेला मिळू शकतो".
आपलं प्रशासकीय सेवेत येण्याचा स्वप्न पूर्ण झाल आहे आपण आता समाधानी आहात का हे विचारल्यानंतर त्या सांगतात, "मी सध्या खुर्चीवर बसून समाधानी आहे परंतु अजून पशुसंवर्धन क्षेत्रात खूप काम करायचे आहे,पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत मराठवाडा मागे आहे.आपल्याकडे पशुसंवर्धन केले जाते.जनावर पाळतात पण त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून जास्त बघितलं जात नाही तो दृष्टिकोन शेतकऱ्यांमध्ये विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे"..
✍️ सोमनाथ भाऊसाहेब गव्हाणे
मो.-9860092569