'महाराष्ट्र केसरी' शिवराज राक्षे चर्चा मात्र सिकंदर शेख ची...

महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार 14 जानेवारी 2023 ला पुण्यामध्ये शिवराज राक्षे विरुद्ध महिंद्र गायकवाड यांच्यात रंगला.या निर्णायक लढतीत शिवराज राक्षे यांनी बाजी मारली परंतु चर्चा रंगली ती माती विभागातील महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख यांच्यातील सामन्याची.

पारंपरिक व्यासपीठ.
महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे.राजश्री शाहू महाराजांनी कुस्ती या खेळाला राजाश्रय दिला.आजही गाव खेड्यात यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात कुस्त्याची दंगल आयोजित केल्या जातात.यात्रा, उत्त्सवाच्या निमित्ताने कुस्तीला व्यासपीठ मिळवून देणार आपल राज्य व परिस्थिती हालाखीची असताना सुद्धा आपल्या घरातील पैलवान घडवण्यासाठी,त्याच्या खुराकासाठी श्रीमंत रुपी आहार उपलब्ध करून देणारी इथली संस्कृती."महाराष्ट्र केसरी"हा महाराष्ट्रातील कुस्तीतील सर्वोच्च बहुमान...

महाराष्ट्र केसरी स्पर्धा.
मागील सहा-सात दशकापासून महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कुस्ती हा खेळ टिकावा,या स्पर्धेच्या माध्यमातून ईथल्या मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश विदेशात देखील चमकावे हाच उद्देश या स्पर्धेचा असतो..'महाराष्ट्र केसरी'ही कुस्ती स्पर्धा माती व गादी (मॅट) विभाग मध्ये होते. यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात 'महाराष्ट्र केसरी' या बहुमानासाठी गदे साठी अंतिम लढत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार मॅट वर होते, आणि या अंतिम लढती मधील विजेता मल्ल हा ‘महाराष्ट्र केसरी’ म्हणून घोषीत करून महाराष्ट्र केसरीची मानाची गदा व तो बहुमान बहाल केला जातो..


              शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी'
'महाराष्ट्र केसरी 2023' च्या अंतिम सामन्यात पैलवान शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली. या लढतीत मॅटवरचा अनुभव असलेला व नावाजलेला पैलवान शिवराज राक्षे यांनी बाजी मारली व महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळवली..


सिकंदर "महेंद्र" की वाद धर्मांध.
 माती विभागातून सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली.या लढतीत महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली.परंतु पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला.पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे सिकंदर शेख यांच्यावर अन्याय झाला अशी चर्चा सोशल मीडिया वर रंगली.शेवटी पंचाच्या निर्णयावर टीका,सिकंदर शेखवर अन्याय ते नावावरून धर्म व त्याच्या धर्मावरून त्याच्यावर अन्यान हा वाद चर्चिला गेला.


कुस्तीचा आखाडा हा राजकीय आखड्यापासून तटस्थ असावा.
राजकीय नेते विविध खेळाच्या संघटनांवर काम करत आहे.त्याचा परिणाम कोणत्याही खेळाडूवर,खेळावर होणार नाही,याची काळजी घेणे महत्त्वाची आहे.पंचाचा निर्णय चुकीचा व अन्यायकारक असेल तर त्यासंदर्भातील त्रुटी लक्षात घेऊन येणाऱ्या काळात त्यात सुधारणा अपेक्षित आहे.कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली तरच कुस्ती या खेळाकडे राजकीय आखाडा म्हणून बघण्यात येणार नाही.


✍️सोमनाथ भाऊसाहेब गव्हाणे.
Mo-9860092569.

Photo Source- Dainik Sakal, Internet...

Popular posts from this blog

प्रशासकिय व्यवस्थेत बदल घडवणारे प्रामाणिक अधिकारी श्री तुकाराम मुंढे

महिला हिंसाचार निर्मूलनासाठी एनजिओ चा पुढाकार महत्वाचा.

औरंगाबादचा चेहरा मोहरा बदलणार 'G-20' म्हणजे आहे तरी काय ?