मराठवाडा आणि विदर्भातील कृषी क्षेत्राला संजीवनी देणारा प्रकल्प.(POCRA)
हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन हवामान बदलामुळे उद्भवलेली परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे....
विदर्भ आणि मराठवाड्यातील 16 जिल्ह्यात 5283 गावांमध्ये सध्या प्रकल्प कार्यान्वित आहे.या प्रकल्पांतर्गत शाश्वत विकासाला अभिप्रेत शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या योजना तसेच प्रकल्प अंतर्गत अर्थ सहाय्य्यित कृषी आधारित छोटे प्रकिया उद्योग सुध्धा उभे राहत असल्यामुळे ग्रामीण विकासाला चालना देणारा सकारात्मक बदल अनुभवायला मिळत आहे .
*भूमिहीन, शेतमजूरांसाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य*
बंदिस्त शेळीपालन तसेच परसातील कुक्कुटपालन या घटका अंतर्गत प्रकल्प क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्याच्या हेतूने, योजनेअंतर्गत बंदिस्त शेळीपालन व परसातील कुक्कुटपालन या भूमिहीन कुटुंबातील व्यक्तींसाठी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने लाभदायक ठरत आहे....
*शाश्वत व संरक्षित जलसिंचनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योजना*
सततचा दुष्काळ हा जणू मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला,टंचाई,दुष्काळ हे शब्द मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी नवे नाहीत..या सर्व परिस्थिती मधून मार्ग काढण्यासाठी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन, वैयक्तिक व सामूहिक शेततळे, जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी जलसंवर्धन कार्यक्रम,इत्यादी योजनेला मिळणारे अनुदान व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी मुळे शाश्वत व संरक्षित जलसिंचनाच्या दृष्टिने लाभदायक ठरत असून शेतकऱ्याकडून सुध्दा अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे...
*शेती व्यवसायबरोबर जोड धंदा*
प्रकल्प अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानामुळे इत मोठ्या प्रमानामध्ये शेतकर्यांनी शेतात शेततळी बांधली.याच शेततळ्यात शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्य शेती करण्यासाठी वापर केल्यास शेतकऱ्यांची उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल,त्या अनुषंगाने या प्रकल्पांतर्गत एकात्मिक शेती पद्धती या घटकांतर्गत शेततळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन या योजेअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते.
*उर्वरित गावांना समाविष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांचा आग्रह*
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत होणारी समृद्धी लक्षात घेता, उर्वरित गावांना प्रकल्पांतर्गत समाविष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडून मागणी होताना दिसत आहे...
✍️ सोमनाथ भाऊसाहेब गव्हाणे.
मो -9860092569