मराठमोळ्या लोककलेचा, उपद्रव माजवणाऱ्या विकृती कडून तमाशा..
कोरोना जागतिक महामारीच्या खंडानंतर गतवर्ष पासून बाळ पंढरपूर असलेल्या दुधना काळेगाव येथे तमाशा चा प्रयोग(खेळ) सुरू झाला.. बाळ पंढरपूर असलेले दुधना काळेगाव म्हणजे पंचक्रोशीतील तमाम मराठमोळ्या लोककलेच्या (तमाशा) रसिकांसाठी जणू पंढरीच...
मनोरंजनाची व्यापक साधने असताना सुध्धा पंचक्रोशीतील सर्व गावातील रसिक या कलेच्या आस्वादासाठी नेहमी आतुरलेली...इथल्या रसिकांनी या कलेला लोकाश्रय दिला खरा परंतु ज्या प्रमाणे मनोरंजनाची साधने व माध्यम बदलले त्याचप्रमाणे रसिकही बदलले....रसिकांनी लोकाश्रय दिलेल्या या कलेला उपद्रव करणाऱ्यांची संख्या वाढल्याने शौकिनांची जागा निव्वळ विकृतीने घेतली.
उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या तमाशा कलाकारांच्या पोटात भीतीचा गोळा उठविणारा तरुणांचा धिंगाणा,अश्लील शेरेबाजी करून केला जाणारा विनयभंग,तमाशा कलावंतावर होणारे हल्ले,अनियंत्रित गर्दी, नियंत्रित करताना करावी लागणारी तारेवरची कसरत,म्हणजेच बिघडलेल्या रसिकामुळे या लोकनाटयाकडे बघण्याचा दृष्टीकोन सुध्धा बदलत आहे.....
लोककला जर आजच्या आधुनिक कलांच्या उद्गात्या असतील तर मग या लोककलांची अशी उपेक्षा या उपद्रवी कडून का होते?जेंव्हा तमाशाचा "रसिक मायबाप"पोटाने मारलेल्या कलावंताच्या घुंगराच्या वेदना समजून घेईल तेंव्हाच खऱ्या अर्थाने या कलेला आणि कलावंतांना न्याय मिळेल.
#maharashtratourism
#maharshtratourismofficial
#maharashtraculture
#traditional
#pune
#mumbai
#satara
#sangali
#lokkala
#lokarang
#loknatya
#tamasha
#jalsa
#lokrang
#तमाशा
#लोककला
#लोककला_शान_महाराष्ट्राची